
Crop Insurance : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक शेतकरी आपल्या बँकेत जाऊन पीक विमा चे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे चेक करत आहे. बहूतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही असे चित्र दिसून येत आहे. परंतू राज्य सरकारने जीआर काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे जीआर हा सर्व शेतकऱ्यांनकडे पोहचला पण पीक विम्याचे पैसे काय खात्यावर जमा होत नाही ? असे सध्या महाराष्ट्रात चित्र आहे.
पीक विमा खात्यावर कधी जमा होणार नाही ? | Crop Insurance
पीक विमा संदर्भात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रक्रिया चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पीक विमा हा जमा होणार नाही. कारण हि प्रक्रियासाठी अनेक दिवस लागू शकतात. कृषी विभागाच्या मते, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील दोन दिवसात विम्या कंपन्याच्या खात्यावर निधी वितरीत केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवड्यात पीक विमा हा जमा केला जाणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार ?
- वाशीम
- गडचिरोली
- यवतमाळ
- अमरावती
- हिंगोली
- छत्रपती संभाजीनगर
किती पीक विमा मंजूर | Crop Insurance
खरीप हंगाम मध्ये २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. यामध्ये अनुकूल हवामान, नैसर्गिक, काढणी पश्चात नुकसान तसेच इतर गोष्टी नुसार पीक विमा वाटप होणार आहे.
खरीप हंगामा मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले याकरिता १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपये पीक विमा वाटप होणार आहे. काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना १४१ कोटी रुपये वितरीत करण्यात येणार आहे. २०२३ पासून ते २०२४ पर्यंत खरीप आणि रब्बी हंगामात अडकलेला पीक विमा सुध्दा वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये तब्बल खरीप २०२३ आणि रब्बी २०२४ या कालवधी मधील २४६ कोटी चा निधी वितरीत होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा चा लाभ मिळणार ?
यामध्ये पुणे, नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, बीड, जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांना पीक विमा हा मिळणार आहे.
कमेंट मध्ये सांगा
तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही ?
तुम्हाला सरकारवर विश्वास आहे का ?
आजच्या काळत शेती हा उत्तम म्हणून तरुणांना पर्याय आहे का ?
1400 कोटी रुपये जमा उर्वरित पीक विमा जमा होणार
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे


आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील,शहादा तालुक्यात अजून पर्यंत पीकविमा भेटला नाही…. आम्हाला तर अजिबात विश्वास नाही की पिकविमा भेटणार,कारण सरकार चे हित साध्य झाले आहे,आता ते शेतकर्यांकडे बघणार नाही,राहीली गोष्ट शेतीची,तर तो तरूणांसाठी काही च कामाची नाही कितीही उत्पन्न आले तरीही,कारण कोणत्याच शेतमालाला योग्य तो भाव नाही, फक्त व्यापारी च धड होतात आणि शेतकरी पुर्ण खड्यात जातो व दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही नवरी मुलगी शेतकरी नवरा मुलाशी लग्न करायला तयार नाही, म्हणून आजच्या तरुणांना शेती म्हणजे फक्त आपला टाईमपास करणे झाले आहे 👍🙏