
Weather : हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच गारपीट होणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची आणि जनावरांची काळजी घ्यावी. राज्यात पुढील ४८ तास हे महत्वाचे असून अनेक ठिकाणी वादळी वारे राहण्याची दाट शक्यता आहे.
आजचा हवामान अंदाज | पुढील 24 तासात अवकाळी पाऊस | Weather
महाराष्ट्रात आज आणि उद्या म्हणजे ७ मे रोजी राज्यात सर्वत्र वादळी वारे आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात गारपीट आणि वादळी वारे वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रासह जम्मू कश्मी आणि तामिळनाडू या ठिकाणी सुध्दा पाऊस राहणार आहे.
imd ने दिलेल्या अंदाज नुसार राज्यात ठाणे, पालघर आणि मुंबई मध्ये येलो अर्लट हा २४ तासासाठी राहील. या भागात जोरदार वारे आणि पाऊस सुध्दा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही तासात पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी गर्मी पासून थोडीशी का होईना सुटका मिळाली परंतू बहूतांश भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा नैसर्गामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पुढील चार दिवस हवामान अंदाज | Weather
पुणेसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस पुढील चार दिवस राहणार आहे. तसेच मराठवाड्यात सुध्दा १० मे पर्यंत अवकाळी पावसाचे संकट राहणार आहे. तुमच्याकडे पाऊस झाला की नाही नक्कीच आम्हाला कमेंटस मध्ये कळवा.