
Insurance : राज्यातील सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामसाठी पहिल्यांदा पीक विमा मंजूर झाला आहे. यामध्ये तब्बल २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याकडून २७९ कोटी मंजूर करण्यात आले आहे. फक्त बार्शी तालुक्यात ९० हजार पेक्षा अधिक नुकसानग्रस्त शेतकरी आहेत.
पीक विमा कसा मिळतो ? | Crop Insurance
गेल्या वर्षी राज्यात खरीप हंगामात अनेक ठिकाणी सततच्या पावसाच्या धारेमुळे शेतकऱ्यांच्या पीकांची नासडी झाली होती. यामध्ये बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट असे इतर भागात सततच्या पावसाने नासाडी केली होती. या नंतर शेतकऱ्यांनी तातडीने म्हणजेच ७२ तासाच्या आत मध्ये पीक विमा कंपन्याना माहिती दिली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळवतांना अडथळ निर्माण झाला नाही.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात २ लाख ३९ हजार नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला अहे. अशी माहिती कृषी विभागाने दिली तसेच २७९ कोटी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला आमची महिती आवडत असेल तर नक्कीच WhatsApp Group वर सामील व्हा.
