
Weather Forecast : महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा या तिन्ही भागात मुसळधार पाऊस हा विविध भागात पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या चार ते पाच दिवस अशाच प्रकारे विविध भागात मुसळधार पाऊस पडत राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार आठवड्याचा अंदाज आपण पाहणार आहोत. के. एस. कोसळेकर हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस सुरू असताना कोणत्याही झाडाखाली थांबवू नये असेही आवाहन देण्यात आलेले आहेत.
पुढील चार आठवड्याचा हवामान अंदाज ( Hawaman Andaj )
17 ते 22 मे पर्यंत महाराष्ट्र, ओडिशा आणि दक्षिण भारतात अवकाळी पावसाचे प्रमाण हे वाढलेले असणार आहे.
22 मे पासून ते 29 मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, दक्षिण भारतात, छत्तीसगड तसेच उत्तर प्रदेशातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
29 मे पासून ते पाच जून पर्यंत तामिळनाडू राज्य सोडता भारतातील बहुतांश राज्यात ढगाळ वातावरण आणि अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे.
5 जून ते 12 जून पर्यंत राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि पूर्व भागातील राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.