
Monsoon Update : यावर्षी राज्यात मॉन्सून १० ते १२ दिवसात अगोदरच लवणार आहे. मुंबई, पुणे, कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे मुसळधार पाऊस पडलेल्या आहे. मागील तीन दिवसात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडलेला आहे.
पावसाचा जोर कमी | Monsoon Update
२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस हा पडलेला आहे. पुणे, कोकण, मुंबई या सह अनेक जिल्ह्यांन येलो अर्लट हा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले होते, ज्यामुळे शेतातील कामे हे रखडलेले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगाल सागरातील कमी दाबाचा पट्टा हा उत्तर भागात सरकला असल्यामुळे पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण हे महाराष्ट्रात पाहयला मिळणार आहे.
पेरणी कधी करावी ?
गेल्या काही दिवसात चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे शेतात चांगल्या प्रकारे ओल निर्माण झाली आहे. तरीही हवामान खात्याने पेरणी लागवड करण्यासाठी घाई हि शेतकऱ्यांनी करु नये असे अहवान केले आहे. १५ जून पर्यंम संपूर्ण मॉन्सून विदर्भात हजेरी लावेल तो पर्यंत शेतकऱ्यांनी प्रतिक्षा करावी असे अहवान केले आहे.
या वर्षाचा हवामान अंदाज
संपूर्ण राज्यात हवामान खात्यानुसार १०८ टक्के पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षित भारतात आणि मध्य भारतात पाऊस हा चांगल्या प्रकारे पडू शकतो.