
Weather Update : मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगली हजेरी लावली होती, परंतू जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहूतांश भागात पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. हवामान खात्यानुसार राज्यात पुढील ५ दिवसात कोकण तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुध्दा पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता दाट आहे.
आजचा हवामान अंदाज | IMD Rain Forecast
हवामान खात्यानुसार राज्यातील कोकण भागात तूरळक ठिकाणी पावसाचा जोर हा कायम पाहयला मिळत आहे. अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यात तूरळक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत राहणार आहे. तसेच खानदेश भागात नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पावसाचा जोर वाढणार
विदर्भात पुढील २४ तासात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस शकतो. यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार पुढील काही दिवसात होण्याची शक्यता दाट आहे.
सर्वाधिक पावसाचा जोर कमी
मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर हा कमी झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील भागात पावसाचा जोर हा कमी राहण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्यानुसार पुढील किमान तीन दिवसात अनेक ठिकाणी हलक्या प्रकारचा पाऊस होऊ शकतो.