Tractor Subsidy : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान, Mahadbt वर अर्ज आवश्यक!

Tractor Subsidy : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान, Mahadbt वर अर्ज आवश्यक!
Tractor Subsidy : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान, Mahadbt वर अर्ज आवश्यक!

 

Tractor Subsidy : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्र सरकार आता शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत २०२५-२०२६ मध्ये कृषी यांत्रिकिकरणासाठी अनुदान देणार आहे. या कालवधीसाठी ४०० कोटी पर्यंत अनुदान हे मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही ट्रॅक्टर सारखे यंत्रे खरेदी करु शकतात. २३ मे २०२५ रोजी या संदर्भात शासन निर्णय जाहिर झालेला आहे.

ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत किती अनुदान ( Tractor Subsidy ) मिळते ?

  • अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या अंतर्गत तुम्ही शेतकरी असाल आणि ट्रॅक्टरसाठी तुम्हाला ५० टक्के किंवा १.२५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
  • इतर गटातील शेतकरी असाल तर तर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी ४० टक्के अनुदान किंवा १ लाख देण्यात येणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार ?

  • सर्वात महाराष्ट्रातील शेतकरी असणे गरजेचे आहे.
  • कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत गेल्या ५ वर्षात कोणत्याही प्रकारचा न घेतलेला पाहिजे.
  • सर्वात महत्वाचे Mahadbt वरुन मंजूरी झाल्यानंतरच ट्रॅक्टर खरेदी होणार आहे.

या योजनेचा लाभ कसा मिळवा ?

  • https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक जातीचा दाखला हे महत्वाचे कागदपत्रे आहेत.
  • ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या आधारावर लाभ होतो.

अपात्र कसे ठरवले जाणार

ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे. त्यांनी प्रथम ट्रॅक्टर खेरदी करु नये. जर तुम्ही मंजूरी मिळण्याअगोदरच ट्रॅक्टर घेतले तर तुम्हाला अपात्र ठरवले जाणार आहे.

सर्वात आधी प्राधान्य

या योजनेअंतर्गत महिला गट शेतकरी गट शेतकरी उत्पादक संस्था अश्या गटांना आधा प्राधान्य दिले जात आहे.

Farm Roads : शेतकऱ्यांची अडचण सुटणार, शेत रस्ते आता तीन ते चार मीटर रुंद केली जाणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment