
Rain Update : मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज आषाढी एकादशी असल्यामुळे सगळीकडे आनंदमयी वातावरण तयार झाले आहे. तसेच शेतकऱ्यांनसाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात बहूतांश भागात येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
आज पाऊस पडणार ?
पुणे वेधशाळानुसार, पुण्यात अनेक ठिकाणी अती मुसळधार पाऊस होणर आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबई मध्ये वसई-विरार, नालासोपारा, बोरीवली, कांदिवली, ठाणे, डोंबिवली ढगाळ वातावरण तसेच पाऊस सुध्दा होण्याची शक्यता दाट आहे.
कोकण आणि गोवा भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे परंतू अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागात पावसाचे प्रमाण अधिक राहिल.
पश्चिम महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल तसेच कोल्हापूर मध्ये अतिवृष्टी सारखा अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.
मराठवाडा : औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी तूरळक ठिकाणी मध्यम प्रकाराचा पाऊस पडेल.
विदर्भ : चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. परंतू उर्वरित भागात भाग बदलत हलक्या प्रकारचा पाऊस होऊ शकतो.
पीकांना मिळणार जीवनदान
सोयाबीन, भात, मका, तूर, भुईमूग, कापूस या पीकांना गेल्या काही दिवसापासून धोका निर्माण झाला होता. गेल्या १० ते १३ दिवसापासून राज्यातील बहूतांश भागात पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट होण्याची शक्यता होती. परंतू हवामान खात्यानुसार, राज्यात बहूतांश भागात येत्या दोन दिवसात पडू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जीवदान मिळू शकते.
सोशल मीडियावर हवामान अपडेट्स
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/kIvRBpyCXY
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 5, 2025