Mansoon Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात उष्णतेची लाट आली आहे, परंतु शेतकरी हा मान्सूनची वाट पाहत आहे. यावर्षी राज्यात बऱ्यापैकी पाऊस राहणार आहे. यामुळे अनेक शेतकरी खरीप हंगामासाठी तयारी करत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आपण ही अपडेट संपूर्ण पाहणार आहोत. येणाऱ्या काही दिवसात मान्सून कुठे असेल, महाराष्ट्रात मान्सूनचे कधी आगमन होईल? हे समजून घेणार आहोत.

केरळमध्ये मान्सूनची गाडी अडकली, बळीराजाची धाकधूक वाढली | Mansoon Update
हवामान खात्याने 26 मे रोजी केरळच्या किनारपट्ट्यावरती मान्सून दाखल होईल असा अंदाज दिला होता. परंतु केरळच्या पट्ट्यावरती अजूनही मान्सून दाखल झालेला नाही तसेच हवामान खात्याने मान्सून संदर्भात पुढील तारीख सुद्धा जाहीर केलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. प्राथमिक माहितीनुसार यावर्षी मान्सून थोडा लांबणीवर असेल असं कळविण्यात येत आहे. परंतु हा अंदाज आहे जेव्हा भारतीय हवामान विभाग अंदाज जाहीर करेल तर ही अपडेट लवकरच तुम्हाला देण्यात येईल.

३ जूनपासून गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी
गेल्या दोन दिवसापासून मध्ये महाराष्ट्रात आणि गोव्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. यावर्षी मान्सूनची गाडी लांबीवर जरी असली तरीही अनेक भागात दिलासा देणारी बातमी येत आहे. हवामान खात्यानुसार तीन जून रोजी पासून गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे.
किनारपट्टीवर ४ ते ११ जून दरम्यान कसा राहील पाऊस?
- जाणकारांच्या मते जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावू शकतो.
- 4 जून ते 11 जून यादरम्यान किनारपट्टीवर कधी कडक ऊन तर कधी हलका पाऊस किंवा जोरदार वारे पाहायला मिळू शकतात.
- राज्यातील इतर भागांचे काय?: महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसा संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. किंवा 11 जून पर्यंत कोणत्याही प्रकारचा हवामान अंदाज जाहीर झालेला नाही, त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना थोडी आणखीन वाट पाहावी लागणार आहे.
मग, संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कधी सुरू होणार?
सर्वाधिक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी सुरू होईल तर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 11 जून पर्यंत कमी अधिक मान्सून सक्रिय होऊ शकतो. दुसऱ्या आठवड्यात चांगल्या प्रकारे मान्सून हा सक्रिय (Mansoon Update) होईल तसेच तिसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हा पाहायला मिळू शकतो असा अंदाज प्राथमिक येत आहे.
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

