
Namo Installment : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, आपण हि सांगण्यात आनंद होतो की तुमच्या खात्यावर तब्बल दोन योजनाचे पैसे जमा होणार आहे. केंद्र सरकारने सुरु केलेली पीएम किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारने सुरु केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देतात. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील वाशिम जिल्ह्यात नमो शेतकरी योजनेअंतर्गत ५ वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १८ वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना कधी पासून सुरु झाली ?
- पीएम किसान सन्मान निधी योजन हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पासून शेतकऱ्यांनसाठी सुरु केली आहे.
- पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होत आहे.
- या योजनेअंतर्गत तब्बल तीन हप्ते वर्ग केले जाते आणि २००० रुपये प्रत्येकी तीन महिन्यानंतर खात्यावर हप्ता जमा होतो.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधी सुरु झाली ?
- महाराष्ट्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सारखी योजना २०२३ मध्ये सुरु केली, यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे म्हटले जाते.
- महत्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत सुध्दा तुम्हाला तीन टप्यात ६ हजार रुपये दिले जाते.
शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन योजनाचे पैसे जमा होणार ?
पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे एकत्र खात्यावर जमा होणार असल्याचे म्हटले जात आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार राज्यात १ मार्चपूर्वी नमो शेतकरी योजनेचा ६ हप्ता जमा होणार आहे. तसेच त्या सोबत पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जमा होऊ शकतो.
- पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ९.४ कोटी रुपायची तूरदूत करण्यात आली आहे.
- नमो शेतकरी योजनेअंतर्गत ९१ लाखाचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने ई केवायशी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.
निष्कर्ष
पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेपासून शेतकऱ्यांना तीन महिन्याला २ हजार रुपये दिले जाते. म्हणजे एकत्र केले तर ४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. तुम्हाला या योजनेपासून लाभ मिळतो का नाही, नक्की कमेंट मध्ये सांगा
