Pik Vima: शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने नुकसान भरपाई जमा होणार

Pik Vima: शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने नुकसान भरपाई जमा होणार
Pik Vima: शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने नुकसान भरपाई जमा होणार

 

Pik Vima: शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये खरीप हंगामसाठी नुकसान भरपाईची मागणी केली होती. या मागणीला विमा कंपनीने मान्यता दिली आहे. येणाऱ्या काळात म्हणजे तब्बल १० दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना लेखी देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अखिल भारतीय किसान संघटनानी हे नेतृत्वाखाली हे आदोलन सुरु ठेवण्यात आले होते, यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहे.

शेतकरी संघटनेचे आनंदोलन | Pik Vima

विमा कंपनीच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी आणि संघटनेने आंदोलन सुरु ठेवले होते. यामध्ये खरीप २०२३ मधील नुकसान भरपाई मिळावी, खरीप २०२४ मधील नुकसान भरपाई बाबत योग्य तो निर्णय घ्यावा, प्रलंबित विमा निकाल लावावा, कृषी कार्यालयांद्वारे योग्य माहिती शेतकऱ्यांना द्यावी, सरकार कडून विमा कंपनील तातडीने निधी वितरीत करावा, अश्या प्रकारे मागण्या ठेवण्यात आल्या होत्या.

नुकसान भरपाईसाठी येणाऱ्या अनेक अडचणी

महाराष्ट्र सरकारने कोणत्याही प्रकारचा निधी विमा कंपनीकडे वितरीत केला नाही, असे मत विमा कंपनीने स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विलंब होत आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.

शेतकरी संघनेचे पुढील दिशा

या मध्ये मुरलीधर नागरगोजे, दत्ता डाके, भगवान बडे, बालाजी कडबाने, सुभाष डाके, दादासाहेब शिरसाट, गंगाधर पोटभरे यासह अनेक शेतकरी आंदोलन करत होते.

आंदोलन सुरु असल्यामुळे शासनाने तातडीने तोडगा काढला. तसेच आमदार सुरेश धस यांनी सुध्दा आंदोलनतील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि विमा कंपनीशी चर्चा केली असे म्हटले जात आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी वारंवार नुकसान भरपाईची मागणी केल्यानंतर विमा कंपनीने आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात‍ किती अंमलबजावणी होते ? यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर अंमलबजावणी नाही झाली तर तीव्र आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Namo Installment : शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 रुपये जमा होणार ?
Namo Installment : शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 रुपये जमा होणार ?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment