
Shetkari karjmafi : सध्या महाराष्ट्रात कर्जमाफी बाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे. येणाऱ्या काही दिवसात सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. महायुती भाजप सरकारने कर्जमाफ केले होते परंतू त्या मध्ये मोठ्या प्रमाणात अटी लावण्यात आल्या आहे. तसेच आता सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल असा अंदाज जाणंकार लोक लावत आहे. सध्या शेतकऱ्यांन वर ३१ हजार कोटीचे कर्ज आहे.
अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर करणार आहे. हे सरकार दर वेळेस कर्जमाफी वरुन बगल देत होते परंतू शेतकऱ्यांनी यावेळेस हा विषय धरुन ठेवला आहे. निवडणूकाच्या काळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे आश्वासन दिले होते. तेव्हा पासून आतापर्यंत मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी च्या प्रश्ना वर सतत बगल दिली आहे. परंतू आता हि बगल त्यांना महागात पडू शकते.
महाराष्ट्रात लाडकी बहिण चालवण्यासाठी सरकारला ३६ हजार कोटी पर्यंत खर्च येतो. परंतू शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३१ हजार कोटीचे कर्ज आहे. मंग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होऊ शकत नाही प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाचे मागील वर्षी अनेक ठिकाणी महापूर तर काही ठिकाणी दुबार पेरणी तसेच अनेक जिल्ह्यात दुष्काळ सारखी परिस्थिती होती. आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांन मध्ये आक्रोस निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना शेती परवली किंवा होत नसेल तर कश्याप्रकारे तो कर्ज फेडू शकतो हा सधा प्रश्न निर्माण होतो. यावरती तुमचे म्हणणे काय स्पष्ट कमेंट मध्ये आम्हाला कळवा.