
Pik Vima : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मागील वर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात मोठे नुकसान झालेले पाहायला मिळाले आहे. याच शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश दिलेले आहे. नुकसान भरपाईसाठी 733 कोटी रुपयांची मदत ही मंजूर केलेली आहे. खरंतर पाहता जुलै ते ऑक्टोबर दरम्यान या दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकळी पाऊस झालेला पाहायला मिळाला, यामध्ये शेतातली माती सुद्धा वाहून गेली होती. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांची सुद्धा जीव गेली होती. यामुळे शेतकरी हात बल झाला होता. परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी एक नवीन दिशा मिळावी तसेच कर्जाचा डोंगर कमी व्हावा, यासाठी राज्य सरकारने पीक विमा मंजूर केलेला आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार | Pik Vima
महत्त्वाचे म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून 733 कोटी 45 लाख 84 हजार रुपयांचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पोर्टल द्वारे रक्कम जमा करण्यात येणार आहे. यामध्ये जिरायती, बागायती आणि बहुवार्षिक पिकांना दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई आधी मिळणार होती. परंतु यामध्ये बदल करत राज्य सरकारने तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा केलेली आहे. म्हणजे प्रति हेक्टर नुसार शेतकऱ्यांना १३ हजार ५०० पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येत आहे. मर्यादा २ पर्यंत ठेवण्यात आली होती परंतू राज्य सरकारने आता ३ हेक्टर पर्यंत मर्यादा केली म्हणजे ४० हजार ५०० पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते.
जुलै आणि ऑगस्ट च्या दरम्यान १ लाख 24 हजार 119 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक आधार मिळणार आहे.
24 तासात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार