
Weather News : दोन ते तीन दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे मध्य भारतात तापमान हे वाढत आहे. तसेच पूर्व भागात सुद्धा प्रचंड उष्णता आहे. उत्तर भारतात आणि इतरही भागात पावसासाठी पोषक वातावरण झालेले माहिती मिळत आहे. पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे.
आज दिल्लीमध्ये पुन्हा एकदा पाऊस होणार आहे. तसेच दिल्लीच्या आजूबाजूला अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. उत्तर भारताकडे पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असू शकते. सध्या भारतात दुहेरी संकट आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाची संकट आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल मध्ये पुढील काही दिवसात आणखीन तापमान वाढ झालेली पाहायला मिळणार आहे. या तीन राज्यांमध्ये प्रचंड उष्णता ही असणार आहे, त्यामुळे तेथील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.
जम्मू-काश्मीर, हिमाचल, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड आणि आसाम मिझोरम या राज्यात अतिवृष्टी तसेच गारपीट जोरदार वारे असणार आहे. गुजरात तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना सुद्धा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे.
Pik Vima Update : प्रति हेक्टर 15 हजार रुपये पीक विमा याच आठवड्यात जमा होणार
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

