
Agriculture Insurance : संपूर्ण महाराष्ट्रात सप्टेंबर आणि ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. खास करून अकोला जिल्ह्यामध्ये 56 हजार 748 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता, या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावे तसेच शेतीसाठी नवीन चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय 18 मार्च रोजी जाहीर केलं होता. शासन निर्णयानुसार ७9 कोटी 48 लाख 51 हजार रुपयाची निधी हा मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तातडीने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे.
पीक विमा खात्यावर जमा होणार | Pik Vima
ई पंचनामा पोर्टल जिल्ह्यातील सातही तहसील ऑफिसमध्ये अतिवृष्टी बाबत काम सुरू आहे. मूर्तीजापुर, तेल्हारा, पातुर, बार्शीटाकळी, बाळापूर, अकोट आणि अकोला या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. 56 हजार 700 शेतकऱ्यांची नुकसान झाल्याची नोंद आहे. तसेच शेतातील माती वाहून गेल्यामुळे अशा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलेला आहे. जवळपास 48 शेतकऱ्यांच्या रानातून खरड वाहून गेल्यामुळे शेतीला चांगलाच फटका बसला आहे. ५७ हजार ३७१ हेक्टर वर शेती पिकांचे नुकसान झाले तसेच ३० हेक्टर पर्यंत शेतातील माती वाहून गेली आहे.
याच पार्श्वभूमीवर १८ मार्च रोजी शासन निर्णय जाहिर करण्यात आला, यामध्ये ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना आता ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपये, पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे. लवकरच पीक विमा खात्यावर जमा होणार आहे.