
Farmer Id Registration : भारत सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक कोटी 19 लाख 11 हजार 984 शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने ओळख क्रमांक देण्याचे लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 17 मार्चपर्यंत महाराष्ट्रात 77 लाख दहा हजार 155 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले आहे. महाराष्ट्र महसूल आणि भूमी अभिलेख विभागद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेत जमिनीबद्दल डेटा तसेच पीक पाहणी आणि आर्थिक व्यवहार याबाबतीत माहिती जमा केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार डिजिटल पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्याचे प्रयत्न करत आहेत. ओळख क्रमांक दिल्यामुळे पिक विमा सिंचन व आरोग्य याबाबत सल्ला देणे किंवा निधी पोहोच करणे अति सुलभ होईल.
शेतकऱ्यांना आता ओळख क्रमांक | Farmer Id Registration
महाराष्ट्रातील अनेक गावात ही योजना पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही ओळख क्रमांक मिळाले नाही. परंतु महाराष्ट्र सरकारने ही जबाबदारी अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर दिली आहे. ज्यामुळे अचूक माहिती शेतकऱ्यांकडून मिळवता शेतकऱ्यांची तपासणी चालू असताना नावाची जुळणी होत नसेल तर याची जबाबदारी तरहट्यावर सोडली आहे. तसेच संबंधित नोंदीची तपासणी चालू आहे.
आत्तापर्यंत 17 मार्च 2025 पर्यंत चार कोटी 16 लाख 58 हजार 616 शेतकऱ्यांना भारत सरकारने डिजिटल ओळख क्रमांक हा दिला आहे. उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा एक कोटी 23 लाख शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहे. महाराष्ट्र हा दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती येत आहे. बिहारमध्ये आत्तापर्यंत सर्वात कमी ओळख क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तातडीने आपली नोंदणी करून घ्यावी तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद.