
Weather : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जाहीर झालेला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राकडे, विरुद्ध दिशेने वारे वाहत असल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट वाढले आहे. महाराष्ट्रात येत्या दहा दिवसात तुरळीक ठिकाणी अवकाळी पाऊस पडू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
महाराष्ट्रात एप्रिलच्याच पहिल्याच दिवसापासून अवकाळी पावसाची संकट निर्माण झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणखीन टेन्शन वाढलेले पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे गडचिरोली वर्धा अकोला अमरावती तसेच अनेक ठिकाणी पाऊस जोरदार होऊ शकतो . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दहा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे.