
Crop Insurance : खुशखबर, खुशखबर, खुशखबर, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये आता पिक विमा वाटप होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा दायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये 426 कोटीचा पिक विमा मंजूर झालेली माहिती मिळत आहे. सर्वाधिक रक्कम ही परभणी जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे.
Crop Insurance रक्कम कधी जमा होणार ?
मराठवाड्यात एकूण रक्कम 17६० कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांसाठी पिक विमा म्हणून मंजूर झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात हा पिक विमा जमा करण्यात सुरू होणार आहे. चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा पहिला हप्ता जमा होणार असे विधान कृषी मंत्री यांनी दिले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धाराशीव या सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने पीक विमा हा मंजूर केला आहे. तसेच विमा कंपन्याकडे निधी वितरित झाल्यामुळे लवकरच विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा चा हप्ता वितरित करतील.
Crop Insurance ची किती रक्कम मंजूर ?
छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण 88 कोटी 21 लाख, जालना मध्ये 263 कोटी 40 लाख, परभणी जिल्ह्यामध्ये 426 कोटी 55 लाख, नांदेड जिल्ह्यामध्ये 357 कोटी 21 लाख, हिंगोली जिल्ह्यात 181 कोटी ५ लाख, बीड जिल्ह्यात 212 कोटी 76 लाख आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 231 कोटी पाच लाख रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे.
शेतकरी मित्रांनो वरील माहिती आवडल्यास नक्कीच आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा, जेणेकरून त्याचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील.