
Crop Insurance : प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे किंवा पाण्याची कमतरता मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पाहयला मिळत आहे. याच गोष्टी वारंवार शेतकरी हा हातबळ झालेला दिसत आहे. पीक विम्याचा फॉर्म भरुन सुध्दा वेळेवर पीक विमा मिळत नाही, अश्या कारण्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. संकाटच्या काळी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. १९३ कोटी ८४ लाख रुपायाचा निधी हा थकी होता परंतू आता हा निधी मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी द्राक्षे, कांदा, भात आणि टोमॅटो असे इतर पीके घेण्यात येणार आहे.
पीक विमा च्या माध्यामातून शेतकऱ्यांना पुन्हा संधी | Crop Insurance
ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली परंतू नाशिक जिल्ह्यात त्याच पावसामुळे ११ ते १९ दरम्यान मोठ्या प्रमाणात पीकांची नासाडी केली होती. यामुळे नाशिक मधील जवळपास १ लाख ८२ हजार ३९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १ लाख ४ हजार हेक्टर पर्यंत नुकसान झालेले आहे. म्हणून राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली आहे. हा निधी लवकर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी केवायशी पूर्ण करावी.
ई केवायसी मुळे पीक विमा साठी अडथळा | Crop Insurance
नाशिक जिल्ह्यातील ४७ हजार १९१ शेतकऱ्यांनी ई केवायशी पूर्ण न केल्यामुळे पीक विमा च्या निधीला अडथळा निर्माण होतो. यांमुळे शेतकऱ्यांना पीक विमाचा हप्ता हा उशीरा मिळतो. जर या शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण नाही केली तर ४२ कोटी १८ लाखाचा निधी हा अडकून राहू शकतो. यामुळे कृपया शेतकऱ्यांनी ई केवायशी पूर्ण करावी.