
IMD : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चालू महिन्यात तसेच मे महिन्यात राज्यात उष्णतेची लाट हि अधिक राहणार आहे. तसेच चालू वर्षी २०२५ मध्ये भारतात पावसाचे प्रमाण हे सामान्य राहणार आहे.
IMD चा हवामान अंदाज
यावर्षी राज्यात सामन्य पावसाची दाट शक्यता आहे
तसेच एल निनोचा प्रभाव जाणवणार नाही.
मे आणि जून महिन्यात पर्यंत राज्यात उष्णता वाढत राहणार.
IMD च्या हवामान अंदाज एल निनो प्रभाव कसा राहिल
गेल्या २०२३ ते २४ मध्ये आपण एल निनो चा प्रभाव पाहिल, यामुळे अनेक भागात पाऊस कमी पडला. पाऊस कमी असल्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण झाली आणि अनेक भागात पीक जळून गेली. तसेच २०२४ मध्ये सुध्दा राज्यात ला निनो मुळे ८ टक्के पाऊस हा अधिक वाढला त्यामुळे अनेक ठिकाणी ओला दुष्काळ पडला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. २०२५ मध्ये IMD हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात १०० टक्के सामान्य पाऊस राहिल तसेच एल निनो किंवा ला निनो चा प्रभाव हा कमी राहू शकतो.
IMD नुसार कोणत्या राज्यांना उष्णतेचा धोका राहणार ?
पूर्व उत्तर भारत, विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा येथे जास्तीत जास्त तापमान सरासरीपेक्षा 2°C ते 5°C जास्त असण्याची शक्यता. काही भागांमध्ये तापमान 45°C ते 47°C पर्यंत जाण्याचा इशारा. महाराष्ट्रातही एप्रिल व मे महिन्यात हवामान अधिक कोरडे व उष्ण राहील.
देशातील पूर्व भागात आपणास जास्त उष्णता पाहयला मिळणार आहे. छत्तीसगढ आणि ओडिसा मध्ये अधिक उष्णतेची लाट राहिल. मध्य प्रदेशात सुध्दा उष्णतेचा वाढत जाणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता वाढत जाणार आहे. महत्वाचे म्हणजे एप्रिल ते जून पर्यंत मध्य प्रदेशत, छत्तीसगढ, ओडिसा आणि महाराष्ट्र या राज्यात ४५ ते ४७ C तापमान राहण्याची शक्यता आहे.
