
Crop Insurance : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक शेतकरी आपल्या बँकेत जाऊन पीक विमा चे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे चेक करत आहे. बहूतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही असे चित्र दिसून येत आहे. परंतू राज्य सरकारने जीआर काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे जीआर हा सर्व शेतकऱ्यांनकडे पोहचला पण पीक विम्याचे पैसे काय खात्यावर जमा होत नाही ? असे सध्या महाराष्ट्रात चित्र आहे.
पीक विमा खात्यावर कधी जमा होणार नाही ? | Crop Insurance
पीक विमा संदर्भात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रक्रिया चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पीक विमा हा जमा होणार नाही. कारण हि प्रक्रियासाठी अनेक दिवस लागू शकतात. कृषी विभागाच्या मते, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील दोन दिवसात विम्या कंपन्याच्या खात्यावर निधी वितरीत केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवड्यात पीक विमा हा जमा केला जाणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार ?
- वाशीम
- गडचिरोली
- यवतमाळ
- अमरावती
- हिंगोली
- छत्रपती संभाजीनगर
किती पीक विमा मंजूर | Crop Insurance
खरीप हंगाम मध्ये २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. यामध्ये अनुकूल हवामान, नैसर्गिक, काढणी पश्चात नुकसान तसेच इतर गोष्टी नुसार पीक विमा वाटप होणार आहे.
खरीप हंगामा मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले याकरिता १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपये पीक विमा वाटप होणार आहे. काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना १४१ कोटी रुपये वितरीत करण्यात येणार आहे. २०२३ पासून ते २०२४ पर्यंत खरीप आणि रब्बी हंगामात अडकलेला पीक विमा सुध्दा वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये तब्बल खरीप २०२३ आणि रब्बी २०२४ या कालवधी मधील २४६ कोटी चा निधी वितरीत होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा चा लाभ मिळणार ?
यामध्ये पुणे, नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, बीड, जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांना पीक विमा हा मिळणार आहे.
कमेंट मध्ये सांगा
तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही ?
तुम्हाला सरकारवर विश्वास आहे का ?
आजच्या काळत शेती हा उत्तम म्हणून तरुणांना पर्याय आहे का ?