
Crop Insurance Live : आत्ताची सर्वात मोठी अपडेट, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अग्रीम पिक विमा 25% नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. पूर्णा तालुक्यात खरीप हंगाम 2024 मध्ये सप्टेंबर च्या कालावधीत अवकाळी पाऊस झाल्यामुळे तूर सोयाबीन कापूस असे इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज होती.
पीक विमा जमा होण्यास सुरुवात | Crop Insurance Today
तीन ते चार महिन्यापासून पिक विमा संदर्भात फक्त आश्वासन मिळत होते. परंतु आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम पिक विमा खात्यात जमा होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी 335.90 कोटी रुपये चा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
शेवटी ही रक्कम मंजूर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित होणार, परभणी जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी तब्बल सात लाख 66 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला होता, या शेतकऱ्यांना आता सोयाबीन, कापूस, तूर या पिकावर पिक विमा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा मिळावा यासाठी अनेक संघटनांनी आवेदन केले होते. परंतु त्यामध्ये यश मिळाले नाही. गेल्या तीन-चार महिन्यापासून सरकारकडे शेतकरी आशेने वाट पाहत होता. सरकारकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले. त्यानंतर पिक विमा संदर्भात मार्ग मोकळा झाला, यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा होत आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 268 कोटी 59 लाख तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 53 कोटी आणि उर्वरित रक्कम म्हणजे तुरीसाठी 14 कोटी 14 लाख इतका निधी मंजूर आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तुमच्या खात्यावर पिक विमा जमा झाला की नाही, नक्कीच आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा धन्यवाद.