
Crop Insurance Live : प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आहे. आता या पीक विमा कंपन्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शेतकऱ्यांना दिवसांन दिवस नुकसान भरपाई कमी मिळत आहेत. तसेच वेळेवर हप्ता मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे. 2016 ते 2022 या कालावधीमध्ये तब्बल 1.7 कोटी रुपये हा प्रीमियम मिळाला होता. यामध्ये 1.3 कोटी रुपये पिक विमा योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले, उर्वरित रक्कम म्हणजे ४० हजार कोटीचा नफा हा पिक विमा कंपन्यांना मिळाला आहे.
विमा कंपन्याना नफा | Crop Insurance Today
महाराष्ट्रात सुद्धा 2016 ते 2023 मध्ये या सात वर्षाच्या कालावधीमध्ये 22 हजार 967 कोटी रुपये पिक विमा योजना अंतर्गत वाटप करण्यात आले होते. त्यानंतर 33060 कोटी रुपयाचा प्रीमियम मिळाला होता. ज्यामुळे उर्वरित रक्कम 10093 कोटी रुपयाचा नफा पीक विमा कंपन्याना झाला होता. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी ही योजना काढण्यात आली, परंतु खरी परिस्थिती पाहता यामध्ये पीक विमा कंपन्यांनाच लाभ होत आहे. शेतकऱ्यांना दिवसांन दिवस नुकसान भरपाई कमी मिळत आहे. तसेच नुकसान भरपाई योग्य वेळी न मिळल्यामुळे, शेतकऱ्यांना आणखीन नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती दिवसांन दिवस खालवत जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा.
2021 ते 2024 या कालावधीमध्ये विमा कंपन्यांकडे 1055 कोटीची मागणी कृषी विभागाने केली होती. मात्र यामध्ये 13 टक्के म्हणजेच 139 कोटीची नुकसान भरपाई दिली होती. यामुळे शेतकऱ्यांना आता पंतप्रधान पिक विमा योजनेवर विश्वास कमी होत आहे. पीक विमा योजनेअंतर्गत 2024 खरीप हंगामामध्ये चार लाख दहा हजार असे अर्ज आढळून आले होते, म्हणजेच 350 कोटीचे नुकसान पीक विमा कंपन्यामुळे झाले होते.
महाराष्ट्र सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. त्यामुळे बहुतांश शेतकरी पीक विमा घेतात. परंतु महाराष्ट्र सरकार विमा कंपन्यांना निधी देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई उशिरा मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत न मिळण्यामुळे नुकसानीचा सामना करावा लागतो. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही, तसेच अचानक अवकाळी पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. एकीकडे वेळेववर नुकसान भरपाई मिळत नाही.
पिक विमा योजने अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा हा कमी दराने मिळत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित निर्माण होत आहे. विमा कंपन्यांना दिवसांन दिवस नफा होत आहे. गेल्या सात ते पाच वर्षात विमा कंपन्यांना पन्नास हजार कोटीचा नफा होत आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना काढली पण यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी विमा कंपन्यांना फायदा झालेला दिसत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी यावरती प्रश्न उपस्थित केले आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा ? धन्यवाद…