
Crop Insurance : गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा माझ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मी दरवर्षी प्रमाणे पीक विमा चा फॉर्म भरत असतो. पण गेल्या दोन ते तीन वर्षा पासून मला Pik Vima हा मिळत नाही. परंतू निधी मंजूर होतो पण खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नाही. यावरती राज्य सरकारने ठोस पाऊल उचवले पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठे पाऊल टाकावे लागेल.
1. 12 पीक विमा कंपन्यासोबत करार रद्द का झाले?
महाराष्ट्र सरकारने २०२३ ते २०२६ पर्यंत असलेला करार पूर्ण होण्याआधीच रद्द करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने ९ कारणे देत १२ पीक विमा कंपन्या सोबत करार हा संपवला आहे.
कृषी विभागाचे ९ कारणे
२०२४ ते २०२५ दरम्यान बोगस पीक विमा अर्ज आढळले
अर्जाची पडताळणी करण्यासाठी अधिक वेळ घालवणे
क्षेत्रफळाचे स्पष्टीकरण नसणे
मुख्य पिकांनसाठी पीक विमा अनियमित वाटणे
पंचनामासाठी अधिक विलंब तसेच चुकीचे आढळवे
सर्वेक्षण बाबत माहिती न पुरवणे
तक्रारीवर मार्ग न काढणे
८०: ११० पध्दतीनुसार सबमिट न करणे
ठिक ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असणे
2. पीक विमा संदर्भात मुख्य दोन निर्णय
राज्यात शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा हा मिळणार नाही कारण योजना बंद असून नावमात्र रुपयात पीक विमा हा मिळत आहे. केंद्रच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रिमियम हा भरावा लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये नाराजगी नाही कारण एक रुपयात पीक विमा योजना हि टिकणार नाही, असे शेतकऱ्यांना आधिच कळाले होते म्हणून फारसा विरोध होत नाही.
कशा प्रकारे पीक विमा वाटप केला जातो ?
प्रथम शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक, हंगामी प्रतिकूलता, काढणीपश्चात नुकसान, पीक कापणी प्रयोग या आधारावर पीक विमा वाटप केला जात होता. परंतू आता राज्य सरकारने हे धोरण रद्द केले आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या नवीन धोरणानुसार राज्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग च्या आधारावर पीक विमा वाटप केला जाणार आहे.
पीक विमा संदर्भात खरे चित्र | Pik Vima
महाराष्ट्रात २०१८ पासून ते २०२३ पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत ४० हजार कोटी पर्यंत पीक विमा वाटप करण्यात आला आहे. यामध्ये अजूनहि शेतकऱ्यांचा पिक विमा हा अडकलेला आहे. तसेच खरीप हंगामा मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी क्लेम केला होता परंतू त्याची अजूनहि पडताळणी झालेली नाही. ऐवढे असूनहि पीक विमा कंपन्याना या दरम्यान ५० हजार कोटी पर्यंत नफा झाला असा दावा CNG ने रिपोर्ट द्वारे जाहिर केले आहे.
तुम्हाला या बाबत काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा ?
विमा कंपन्याना 5 वर्षांत 50 हजार कोटीचा नफा, शेतकरी कर्जबाजारी