
Pik Vima Update : मागील खरीप हंगामामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून 25% चा पिक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. परंतु एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये फक्त दोनशे रुपये जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. जवळपास पावणेतीन लाख शेतकऱ्यांसाठी 78 कोटीचा पिक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे.
खरीप हंगामामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकांची नुकसान झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांमध्ये विमा कंपन्याकडे आपली तक्रार दिली होती. तसेच कृषी विभागाकडून आणि विमा कंपन्याकडून पंचनामे सुद्धा करण्यात आले होते. याचा सविस्तर अहवाल हा वरील अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला होता. परंतु नुकसान भरपाई मिळाली परंतु पुरेशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच आणि काही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत.
देशात दिवसांन दिवस महागाई होत आहे. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त पीक विमा 200 रु किंवा 250 रुपये अशाप्रकारे दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्याचेही समोर येत आहे. महागाईच्या काळात 200 रुपये आणि आठशे रुपयात काय होते हे आपण जाणू शकता ? महागाईच्या काळात या पैशांमध्ये काहीच होत नाही. महाराष्ट्र सरकार कोणत्या आधारावर ही नुकसान भरपाई देत आहे, हे कळत नाही आपणास काय वाटते नक्की कमेंटमध्ये कळवा.
