
Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे देवा भाऊ, म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस वर्धा येथील जिल्ह्यात होते. त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज पुरवठा केला जाईल तसेच प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचे वीज बिल हे कमी करण्यात येईल असा निर्णय घेतल्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मते महाराष्ट्र सरकारने देशात प्रथमच पाच वर्षांनी विजेचे दर हे कमी करून दाखवले आहे. तसेच आमदार व खासदार यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्यामुळे एक स्वतंत्र बैठक घेऊन, त्यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही दिली जाईल. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्याचा काही कालावधीसाठी मी सुद्धा एक पालकमंत्री होतो, येते विशेष माझे लक्ष राहील.
महाराष्ट्र सरकार विजेचे दर कशाप्रकारे कमी करण्यात येईल यावर जास्त भर दिला जाईल तसेच जास्तीत जास्त लोकांना यापासून दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज उपलब्ध होणार तसेच 80 टक्के महाराष्ट्रात शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावरती सोलर लावण्याचा प्रयत्न राहील तसेच घराकरता दोन लाख रुपये मिळतील आणि या नागरिकांना मोफत वीज सुद्धा राहील. आपणास याबद्दल काय वाटते नक्की कमेंट मध्ये कळवा.
