Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 20,000 हजार रुपये बोनस मिळणार

Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 20,000 हजार रुपये बोनस मिळणार
Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 20,000 हजार रुपये बोनस मिळणार

 

Agriculture News : महाराष्ट्रात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत म्हटले आहे की, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20 हजार रुपये हे अनुदान आम्ही देत आहोत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

विरुद्ध पक्ष्यांनी विधान परिषदेमध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. विरोधकांना उत्तर देत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी म्हटले की, आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत बोनस अनुदान देत आहोत. तसेच 1800 कोटीचा निधी हा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राखीव करण्यात आलेला आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार होईल.

सौर कृषी पंप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. यामुळे राज्य सरकार आता दहा लाख पर्यंत सौर कृषी पंप महाराष्ट्रात बसवण्याची उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च येतो यासाठी सुद्धा 20 हजार रुपये मंजूर करण्यात येत आहे. अनेक भागात पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे १० एचपी क्षमतेच्या पंपांना अनुदान देण्यात येणार नाही. परंतु 7.5 सौर कृषी पंपान महाराष्ट्र सरकार अनुदान देत आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी महाराष्ट्रात आता 30 कापूस खरेदी केंद्र उभारण्याची तयारी केली आहे. सीसीआयकडे महाराष्ट्र सरकारने याकरिता प्रस्ताव पाठवत आहे.

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत अडीच लाखापेक्षा सौर कृषी पंप हे बसवण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना बूस्टर पंपांचीही मदत दिली जात आहे. ज्यामुळे महाराष्ट्र हा वीज बिल मुक्त होईल. येणाऱ्या काही वर्षात विजेचे दर हे आणखीन कमी होतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोपे होईल, कृषी क्षेत्राला चांगली प्रकारे चालना मिळावी. यासाठी राज्य सरकार नवनवीन योजना राबवणार आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन व्हावे व आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग चालू आहेत.

सौर कृषी पंप साठी नवीन नियम | शेतकऱ्यांचे टेंन्शन वाढणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment