
Bonus : महाराष्ट्र शासनाने दोन ते तीन वर्षांपूर्वी शेती मालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला होता. तसेच मागील वर्षीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बोनस हा वितरित करण्यात आला होता. मात्र, यावर्षी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणताही बोनस जाहीर केलेला नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी ही पाहायला मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना ओला दुष्काळा तसेच इतर भागात पावसाची कमतरता असल्यामुळे शेतातून चांगल्या प्रकारे उत्पादन झालेली नाही. शेतकऱ्यांची आर्थिक समस्या पाहिली पाहिजे, जर शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर नाही झाल्यास असंतोष हा वाढत जाणार आहे.
Solar Energy : शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दिवसा वीज मिळणार
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून गेल्या वर्षी हेक्टरी 20 हजार रुपये बोनस वितरित केला होता. याच बोनसच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बोर, शेततळी अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या होत्या. परंतु यावर्षी बोनस नाही मिळाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. 2024 मध्ये खरीप हंगामामध्ये शेतावर वेगवेगळ्या प्रकारच्या किड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला. यामुळे शेतात चांगल्या प्रकारे उत्पादन आले नाही. या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपये पुन्हा एकदा बोनस जाहीर करावा अशी विनंती शेतकऱ्यांकडून होत आहे.
मागील वर्षी दिलेला बोनस अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याच्या तक्रारी सुद्धा येत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च नंतर शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये देण्याची शक्यता आहे, परंतु या गोष्टीची पुष्टी करत नाही.
Farmer Id : पीक विमा आणि अनुदान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ?