
Cotton Yield : राज्यात नगदी पीक म्हणून कापसाला ओळखले जाते. सध्याच्या परिस्थितीत शेतीचा खर्च हा वाढला, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या नफा हा पदरात पडत नाही. कापूस पीक घेत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. यामध्ये पेरणी पासून ते लागवड पध्दत, खताचा वापर, बियाणे पर्यंत आपण माहिती देणार आहोत. यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन दुप्पट करता येईल.
कापसाचे पीक फायदेशीर आहे का ?
मजुरी, खते, फवारणी औषध महाग झाले आहेत.
कितीही उत्पादन मिळवले तरीही योग्य प्रकारे भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत नाही.
कापसाचे उत्पादन ( Cotton Yield ) दुप्पट कसे करावे ?
गळफांदी
गळफांदी पासून आपणास जवळपास ७ ते ८ बोंड मिळतात परंतू हि गळफांदी जमिनीजवळ असते.
गळफांदीला कीड अधिक लागतात तसेच यास अधिक हवा आणि प्रकाश हा मिळत नाही त्यामुळे खालुन बोंड हे हलके राहतात
४० दिवसानंतर १ इंच शेंडा हा कापावा ज्यामुळे कीड्यांचा प्रभाव कमी होतो.
फळफांदी
फळफांदी या फांदीला चांगले बोंड येतात परंतू अन्नद्रव्य अधिक वाया जाते.
Fertilizer Use : रासायनिक खत vs कीटकनाशक, काय अधिक वापरले जाते आणि का?
कापूस लागवड पध्दत
कापूस लागवड करत असताना अंतर ठेऊन कापसाची लागवड झाली तर हवा खेळती राहते तसेच पीक परिपक्वता येते, ज्यामुळे कीड्यांचा प्रभाव सुध्दा कमी होऊन जातो.
हलकी जमीन = २.५ x १ फुट
मध्यम जमीन = ३ x १ फुट
जड जमीन = ४ x १ फुट
खत व्यवस्थापन
१ बॅग १०:२६ (NPK)
१ बॅग DAP + १ बॅग पोटॅश + ५-१० किलो रायझोबियम
३ बॅग सुपर फॉस्फेट + १ बॅग पोटॅश
जर वरील प्रमाणे प्रति एकर मध्ये खताचा वापर केला तर फॉस्फरस आणि पोटॅशियम चांगल्या प्रकारे मिळते.
निष्कर्ष
वरील प्रमाणे लागवड पध्दत तसेच खत योग्य पध्दतीने दिले तर नक्कीच कापूस उत्पादनात ( Cotton Yield ) फरक जाणवेल.
सूचना : वरील बातमी १०० टक्के खरी आहे परंतू हि माहिती सोशल मिडिया द्वारे घेतलेली आहे. ज्यामुळे या माहितीची खात्री देत नाही.
organic fertilizers : सेंद्रिय खत कोणते वापरावे ? शेणखत, गांडूळ खत की कोंबड खत चांगले!