
Crop Damage Compensation : महाराष्ट्र सरकारने २७ मे मंगळवारी बैठक घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसा बाबत चर्चा केली. गेल्या काही दिवसात ज्या शेतकऱ्यांचे शेती पीकांचे मोठे नुकसान झाले अश्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत. परंतू यामध्ये पंचनामे न करता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे मत शेतकरी नेते यांचे आहे.
गेल्या रविवारी २५ मे रोजी पावसामुळे ३४ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले तसेच तोंडावर खरीप हंगामा आला आहे. त्यात महगाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बहूतांश संकटात सापडला आहे.
महाराष्ट्र सरकार या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला जाईल असे वाटले होते.या बैठकी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने नुकसान भरपाई जमा होईल असे मत शेतकऱ्यांचे होते परंतू असे काही झाले नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये अक्रोश निर्माण होत आहे.
तुम्हाला या बाबत काय वाटते नक्की कमेंट मध्ये कळवा.