
Crop Insurance : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजनेअंतर्गत मोठाले बदल करण्यात आले आहे. परंतू गेल्या काही महिन्यापासून पीक विमा योजनेअंतर्गत अनेक घोटाळे समोर आले आहेत. बहूतांश शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत १ रुपयात पीक विमा योजना काढली होती. गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकारने पीक विमाचा लाभ शेतकऱ्यांना दिला आहे. परंतू आता १ रुपयात पीक विमा हा राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मध्ये नाराजगी आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पीक विमा योजनेत बदल करुन योग्य पध्दतीने लागू करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सरकारने ९ मे २०२५ रोजी एक शासन निर्णय जाहिर केला, त्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा कश्याप्रकारे दिला जाईल आणि १ रुपयात पीक विमा बंद करण्यात येत असे उल्लेख करण्यात आले आहे.
1 रुपयात पीक विमा बंद
प्रधानमंत्री पीक विमा योजना हि २०१६ पासून महाराष्ट्रात राबवली जात आहे. यामध्ये गरजू शेतकऱ्यांना संकट काळी पीक नुकसान भरपाई देण्यात आहे. परंतू यामध्ये महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करत २०२३ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत १ रुपयात पीक विमा देण्याचा ठराव पास केला. तब्बल दोन वर्षी हि योजना चालू राहिली परंतू अचानक राज्य सरकारने हि योजना बंद पाडली आहे.
1 रुपयात पीक विमा योजना का बंद पाडली ?
हा प्रश्न सर्व साधरण शेतकऱ्यांच्या मनात उभा राहिला आहे. याचे मुख्य कारण गेल्या काही दिवसापासून राज्यात पीक विमा संदर्भात मोठी चर्चा होत आहे. यामध्ये ५ लाख ८२ हजार फक्त बोगस अर्ज आढळून आले आहेत. तसेच अनेक अधिकांऱ्यानी, मध्ये घोटाळे केलेले समोर उघड झाले आहेत. शेती न करता लाभ मिळवणे, इतर जागेवर विमा मिळवणे तसेच खोटी कागदपत्रे तयार करुन लाभ मिळवूणे असे अशा पध्दतीने पीक विमा योजनेचा लाभ हा मिळवला जात होता. शेतकऱ्यांच्या पैसा इतर वाया जावू नये किंवा या योजनेत भ्रष्टचार वाढू नये यासाठी राज्य सरकारने १ रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे. पुढे वाचा
आता पीक विमाचे पैसे कसे भरावे लागणार ?
यापूर्वी १ रुपये देऊन शेतकरी आपली नोंद पीक विमा योजनेअंतर्गत करत आणि उर्वरित रक्कत राज्य सरकार आणि केंद्र सरकार पीक विमा कंपन्याकडे रक्कम भरत होते. परंतू आता असे करत येणार नाही.
शेतकऱ्यांना आधाी विमा संरक्षित करण्यासाठी २ टक्के, रबी हंगाम साठी १.५ टक्के तसेच दोन्ही हंगामाचा लाभ मिळवण्यासाठी ५ टक्के इतकी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. उदा. १ हेक्टर साठी ३५ हजार विमा संरक्षण आहे. यामध्ये तुम्हाला विमा संरक्षित करण्यासाठी २ टक्के म्हणजे ७०० रुपये भरावे लागणार आहे.