Crop Insurance : पीक विमा योजनेअंतर्गत 29 जिल्ह्यात वाटप होणार

Crop Insurance : पीक विमा योजनेअंतर्गत 29 जिल्ह्यात वाटप होणार
Crop Insurance : पीक विमा योजनेअंतर्गत 29 जिल्ह्यात वाटप होणार

 

Crop Insurance : 29 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दोन ट्रीगर अंतर्गत पिक विमा वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. आत्तापर्यंत या दोन ट्रिगर अंतर्गत मधून 3178 कोटी रुपयाची नुकसान भरपाई 22 एप्रिल रोजी मंजूर करण्यात आली होती. 3178 कोटी पैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 1620 कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 1५५८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करणार आहेत. परंतु काही प्रक्रियामुळे उशीर होऊ शकतो असे कृषी विभागाने म्हटले आहे.

पीक विमा वाटप होणाार | Crop Insurance Today

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ट्रिगरअंतर्गत नुकसान भरपाई देणे अनिवार्य आहे. विमा कंपन्याने दिलेल्या माहितीनुसार पहिला हप्ता नैसर्गिक आपत्ती दुसरा हप्ता प्रतिकूल परिस्थितीनुसार या दोन ट्रीगर अंतर्गत नुकसान भरपाई सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. तसेच पीक कापणी प्रयोग या आधारावरती शेतकऱ्यांना दुसराही हप्ता दिला जात आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परंतु प्रक्रियेसाठी विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे. परंतु कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होईल. टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येईल.

पुणे कोल्हापूर नासिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर या सात व‍िभागा मध्ये दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा वितरीत होणार आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नुकसान ग्रस्त शेतकरी आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा हा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यामध्ये नुकसान ग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून महाराष्ट्र सरकारने 3 हजार 178 कोटी रुपये इतका निधी पिक विमा योजनेअंतर्गत मंजूर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच पूर्व आतापर्यंत एक हजार सहाशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित रक्कम येणाऱ्या काही दिवसात जमा होईल. महाराष्ट्र कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नुकसान भरपाईची रक्कम आणखीन वाढू असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment