
Crop Insurance : गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना २०२४ मध्ये खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून ३ हजार ७२० कोटी रुपये इतका निधी पीक विमा योजनेअंतर्गत मंजूर केला होता. यामधून शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ३ हजार १२६ कोटी वितरीत करण्यात आले आहेत.
शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा | Crop Insurance
पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या काही दिवसात 307 कोटी रुपये वितरित होणार आहे. परंतु 287 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार पिक विमा कंपन्याकडे 287 कोटी रुपये वितरित करतील, तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये पीक विमा हा वेगवेगळ्या ट्रिगर मधून मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई ही वाटप केलेली आहे. येत्या काही दिवसात काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोग या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिला जाईल.
आत्तापर्यंत राज्य सरकारने 9 एप्रिल पर्यंत 3720 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी मंजूर केली होती. यामधून नऊ मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हजार 126 कोटी रुपये इतका निधी हा जमा करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2024 मधील दोन ट्रिगर मधील पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. उर्वरित 307 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रक्रिया सुरू आहे.