
Crop Insurance : मागील वर्षी खरीप हंगाम २०२४ मध्ये अनेक जिल्ह्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी असे इतरही शेती पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती पीकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हि खालवली आहे. त्याच दरम्यान पीक विमा कंपन्याकडे शेतकऱ्यांनी ६ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये केंद्र सरकारने ३० टक्के सॅम्पल सर्वे केले आहेत.
किती कोटीचा पीक विमा मंजूर ?
याचा अर्थ असा आहे की, थोडीशी जमीन पाहून, त्या आधारावर उर्वरित शेतकऱ्यांचा असाचा अहवाल तयार केला गेला आहे. याच आधारावर शेतकऱ्यांना ४१ कोटी ६५ लाख रुपयाचा पीक विमा ( Crop Insurance ) हा मंजूर करण्यात आला आहे. हा पुरेसा नसल्याच म्हणटल जात आहे. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये मोटी नाराजी समोर येत आहे.
विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि उत्पादन आधारित नुकसान भरपाई या दोन्ही घटका अंतर्गत ११० कोटी पर्यंत पीक विमा मंजूर केला आहे. तसेच एक लाख पाच हजार अर्जदार शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती मध्ये जवळपास १०० कोटी पीक विमा मंजूर झाला आहे. तसेच उत्पादन आधारिक नुकसान भरपाई म्हटल तर १० कोटी ८५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात १५० कोटीचा निधी मंजूर आहे. तसेच मीड सीझन ॲडव्हर्सिटी अंतर्गत २५८ कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर केला होता. म्हणजेच अश्या गोष्टीचा विचार केला तर ४०८ कोटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या मते, जी नुकसान भरपाई मिळाली आहे ती शेतकऱ्यांना पुरेशी नाही. शेतकऱ्यांचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात झाले आहे. याबाबत प्रा. रवींद्र चव्हाण यांनी लोक सभेत आपले मत मांडले, नांदेडच्या अधिकाऱ्यांनी २५ टक्के नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या प्रश्नाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे.
स्रोत : जिल्हा प्रशासन, नांदेड / कृषी विभाग माहिती / शेतकरी प्रतिनिधी
Weather News : राज्यातील बहूतांश जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा