
Crop Insurance : महाराष्ट्र सरकारने विमा कंपन्याकडे पहिल्या हप्त्याची रक्कम अजूनही वितरित केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही पोहोचलेली नाही. नैसर्गिक गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याअंतर्गत 2160 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च च्या आत मध्ये विमा कंपन्याकडे पहिल्या हप्त्याची रक्कम ही वितरित करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांना हा हप्ता तातडीत मिळणार आहे.
पीक विमा कधी खात्यावर जमा होणार ? | Crop Insurance
शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यायची तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहेत ? या सर्व गोष्टीचा आकडा विमा कंपन्यांनी काढलेला आहे. ज्यामुळे नुकसान भरपाई, पीक कापणी प्रयोग व हंगामात झालेले नुकसान या आधारित, नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई ची रक्कम वितरित केल्यानंतर विमा कंपन्यांना पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करतील. ही रक्कम 2160 कोटी पर्यंत जात आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, याकरिता 1455 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हंगाम मध्ये सात ते सहा कोटी रुपये इतका पिक विमा मंजूर करण्यात आला होता. तसेच काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 141 कोटी रुपये मंजूर करण्यात आली होती. पीक कापणी प्रयोगावर महाराष्ट्र सरकारने 13 कोटी चा पिक विमा मंजूर केला होता.
गेल्या काही महिन्यापासून देशात महागाई वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैशाची जास्त गरज भासत आहे. त्यामध्ये अजूनही शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून कोणत्याही प्रकारची मदत न मिळण्यामुळे, शेतकऱ्यांवर अनेक संकटे उभे राहिले आहे. नुकसान भरपाई मंजूर असूनही शेतकऱ्यांना पिक विमा का दिला जात नाही. या संदर्भात विरोधक विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावरती उत्तर माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मते 31 मार्च च्या आत मध्ये पिक विम्याची रक्कम विमा कंपन्याकडे वितरित केली जाईल तसेच 31 मार्चच्या आत मध्ये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा करण्यात येईल.
शेतकऱ्यांना पहिला हप्ता देण्यासाठी सातशे कोटीचा निधी हा गरजेचा आहे. केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून पहिला हप्ता विमा कंपनीकडे वितरित झाल्यानंतर नैसर्गिक वेळेवर पेरणी न होणे तसेच अनुकूल हवामान नसल्यामुळे या आधारावरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून २१६० कोटी रुपये वितरित होणे बाकी आहे. ही रक्कम 31 मार्च पूर्वीच विमा कंपनीकडे वितरित होईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. पुढील तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई चा पहिला हप्ता जमा होईल अशी आशा आहे .