
Crop Insurance Payout: हातात आलेला घास अवकाळी पावसामुळे वाया गेला तसेच मालाला योग्य भाव सुध्दा मिळाला नाही. यामुळे दिवसांन दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. ऐकीकडे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला परंतू हा पीक विमा कधी मिळणार याच प्रतिक्षात शेतकरी वाट पाहत आहेत. ३२७५ हजार कोटीचा पीक विमा हा मंजूर झाला, यापैकी १४७३ कोटी रुपाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. उर्वरित १७०२ कोटीचा पीक विमा येत्या सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु असे आश्वसन कृषी विभागाने दिले आहे.
आठवडाभरात ३ हजार १७५ कोटीचा पीक विमा खात्यात जमा | Crop Insurance Payout
केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना कमी दरात प्रिमियम ठेऊन शेतकऱ्यांना नैसर्गिक घटना तसेच अवकाळी पाऊस आणि रोगराई अशा इतर घटनावर निधी दिला जातो. शेतकऱ्यांनी कमी दरात प्रिमियम भरल्यानंतर उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून रक्कम भरतात. वेळेवर पीक विमा भरला जातो परंतू वेळेवर शेतकऱ्यांना हा पीक विमा कधीचा पोहच होत नाही.
शेतकऱ्यांनसाठी राज्य सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी २ हजार ४६७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच प्रतिकूल हवामानसाठी ७०८ कोटी रुपये असे एकून मिळून ३ हजार १७५ कोटी रुपये नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनसाठी मंजूर करण्यात आले आहे. आता पर्यंत पीक विमा कंपन्यानी १४७३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली आहे. उर्वरित रक्कम १७०२ कोटी रुपये विमा कंपन्याकडे बाकी आहे.