
Crop Insurance Payout : पीक विमा २०२४ मधील रखडलेला आहे, यामध्ये ३ हजार ८४७ कोटी इतका निधी खरीप हंगामातील शेतकऱ्यांना मंजूर केला होता.
गेल्या खरीप हंगामा मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, या शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून तातडीने पीक विमा मंजूर करण्यात होता. खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना ३ हजार ८४७ कोटी पीक विमा हा मंजूर केला तसेच महाराष्ट्र सरकारने दोन हप्ते दिले आहे. उर्वरित काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोग यांच्या निकाषाच्या आधार वर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
४ ट्रीगर अंतर्गत खरीप हंगाम २०२४ मधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हि दिली जात आहे. नैसर्गिक, प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान, पीक कापणी प्रयोग या चार गोष्टीच्या आधारावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हि मंजूर केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने आर्थिक आधार तातडीने पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत केला होता, तसेच उर्वरित दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना हप्ता सध्याच्या पिरस्थितीत दिला जात आहे.
कश्याप्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाला ?
गेल्या खरीप हंगामात ८० लाख ५४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मंजूर करण्यात आली होती. यामध्ये नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार ८४७ कोटीची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पर्यंत ७३ लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ हजार ४३८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ५६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांना २ हजार २८० कोटी रुपये ( स्थानिक नैसर्गिक आपत्ती ) पीक विमा मंजूर झाला त्यापैकी ५६ लाख १३ हजार शेतकऱ्यांना २ हजार ६८४ कोटी रुपयाचा निधी खात्यावर जमा करण्यात आला आहे. १९ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना ७१२ कोटी चा पीक विमा मंजूर होता यापैकी आतापर्यंत १८ लाख ९२ हजार ७०७ कोटी निधी जमा झालेला आहे. २ लाख ८८ शेतकऱ्यांना २७७ कोटीचा पीक विमा काढणी पश्चात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती यामध्ये २१ हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी रुपये खात्यावर वितरीत झालेले आहेत. पीक कापणी प्रयोग आधारावर राज्य सरकारने १ लाख ७४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे परंतू यामध्ये शेतकऱ्यांना फक्त ७ कोटीचा पीक विमा खात्यावर जमा ( Crop Insurance Payout ) करण्यात आला आहे.
उर्वरित पीक विमा कधी जमा होणार ?
स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थितीत या ट्रीगर अंतर्गत बहूतांश शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात आला आहे. या मध्ये शेतकऱ्यांना ३ हजार ३९१ कोटीचा पीक विमा मिळाला परंतू १६१ कोटीचा पीक विमा वितरीत करणे बाकी आहे. काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोग या दोन ट्रीगर मध्ये शेतकऱ्यांना १०१५ कोटीचा पीक विमाचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे. सर्व वाटप झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा २४८ कोटीचा पीक विमा वाटप ( Crop Insurance Payout ) केला जाणार आहे.
तुमच्या खात्यावर पीक विमा जमा झाला की नाही, नक्कीच आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.