
Crop Insurance Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. २०२४ मध्ये खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते, याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी २ हजार ३०८ कोटी पर्यंत पीक विमा मंजूर करण्यात आला होता. हा निधी फक्त मंजूर झाला होता पण शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात आली नव्हती. परंतू आता १४ एप्रिल पासुन आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १४०० कोटीचा पीक विमा जमा करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप | Crop Insurance Update
शेतकऱ्यांना यामध्ये तीन ट्रिगरच्या आधारावर पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, हंगामात प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वाटप केला जाणार आहे. गडचिरोली, भंडारा, अमरावती, वाशीम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, बुलढाणा, हिंगोली, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, पुणे, नंदुरबार, धुळे असे एकून २२ जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे.
१८ लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर | Crop Insurance Update
२५ टक्के अग्रिम पीक विमा नांदेड, यवतमाळ, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात जाहिर केला आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी पीक विमा देण्यास विमा कंपन्यानी नकार दिला आहे. उर्वरित तीन जिल्ह्यासाठी ७०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. नांदेड परभणी आणि हिंगोली तब्बल १८ लाख ८४ हजार शेतकरी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत.
उर्वरित पीक विमा वितरीत होणार | Crop Insurance Update
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत १४०० कोटी वाटप झाले परंतू उर्वरित रक्कम म्हणजू ९०८ कोटी रुपये आहेत. उर्वरित रक्कम सरकारकडून विमा कंपन्याकडे वितरीत प्रक्रिया मध्ये आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होऊ शकतो.