
Crop Loan Subsidy : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकार नवनवीन योजना राबवत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ३० जून पूर्वी जर पीक कर्जाचे नूतनीकरण केले तर महाराष्ट्र सरकारन व्याज मध्ये सवलत तसेच नवीन पीक कर्ज सहज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
Crop Loan Subsidy | 30 जून पूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करा आणि लाभ मिळवा
पीक कर्ज २०२५ आणि २०२६ या वार्षिक साठी राज्य सरकारने १ हजार ५०० कोटीचा निधी हा वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५०० कोटीचा निधी हा १ लाख ५६ हजार ४०० शेतकऱ्यांना दिला जाईल असे लक्ष ठेवले आहे. परंतू मिळालेल्या अपडेट नुसार, आतापर्यंत २४७ कोटी चा निधी हा २१ हजार ४६८ शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले आहे.
जर शेतकऱ्यांनी ३० जून पूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण केले तर बँकेकडून त्यांना १० टक्के वाढीव कर्ज हे दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी संधीचा वापर करुन व्याज सवलत तसेच परतावा घेतला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांचे मते, बहूतांश शेतकऱ्यांनी पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना नोंदणी करावी तसेच पंतप्रधान जीवन ज्योती योजनेअंतर्गत नोंदणी करावी, यामुळे विमा संरक्षण मिळते.
