
Cyclone Shakti : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे तेथे “शक्ती चक्रीवादळ” चा या नावाने वादळ तयार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यास चक्रीवादळाला श्रीलंकाने नाव दिले असे म्हटले जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ २१ मे पासून ते २९ मे पर्यंत मोठा आकार घेऊ शकतो. ज्यामुळे सामान्य नागरिकांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे मत हवामान खात्याचे आहे.
“शक्ती चक्रीवादळ” चा धोका वाढणार | Cyclone Shakti
खास करुन २५ मे पर्यंत देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यात शक्ती चक्रीवादळाने मोठे स्वरुप घेतले तर ओडिसा, पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशावर भंयकर परिणाम होऊ शकतो. भारतीय भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील फक्त ३ दिवसात कमी दाबाचे पट्टे तयार होणार, त्यातील एका कमी दाबाच्या पट्ट्यापासून मोठे चक्रीवादळ तयार होणार. त्यामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस देशात होऊ शकतो आणि सामान्य नागरिकांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
मॉन्सून देशात येणार
imd ने दिलेल्या माहितीनुसार, १६ मे पर्यंत कर्नाटक या राज्यात मॉन्सून हजेरी लावणार आहे. येत्या काही दिवसात राज्यात सुध्दा मॉन्सून तीव्र गतीने हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. परंतू १६ मे पर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस पडत राहिल.
