
Dudh Anudan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर झाले होते. परंतु या शेतकऱ्यांना अजूनही अनुदान न मिळल्या मुळे शेतकऱ्यांन विषयी चर्चा आता विधानसभेमध्ये होत आहे. तीन महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात ११ कोटी तर नोव्हेंबर मध्ये 141 कोटी असे एकूण मिळून 152 कोटी शेतकऱ्यांना आहे. 152 कोटी अनुदान मंजूर असूनही शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा पहावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत उत्पादनाचा खर्च हा वाढलेला आहे. दुधापासून जास्तीत जास्त उत्पादन निघत नाही आणि मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती बिकट आहे.
Dudh Anudan अनुदान किती आहे ?
महाराष्ट्र शासनाने 12 जुलै 2024 मध्ये शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे पाच रुपये अनुदान हे मंजूर केले होते. पुणे जिल्ह्यात अनेक दूध प्रकल्प तसेच 118 सहकारी यांची नोंद आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे पाच रुपये अनुदान ची घोषणा होत होती, त्याच दरम्यान प्रति लिटरला 30 रुपये दर असा मिळत होता.
आतापर्यंत शेतकऱ्यांना 179 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा केले असून उर्वरित 11 कोटी हे देणे बाकी आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रति लिटर मागे आणखीन दोन रुपये हे वाढवण्यात आले म्हणजेच आधीचे पाच रुपये अनुदान तसेच एक ऑक्टोबर 2024 रोजी दोन रुपये असे मिळून सात रुपये होत आहे. आणि त्या कालावधीमध्ये 28 रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळत होता.
पुणे जिल्ह्यामध्ये पाच लाख 77 हजार 607 शेतकरी दूध उत्पादक आहेत. या शेतकऱ्यांना 20 कोटी 16 लाख 34 हजार 301 इतक्या लिटरला सात रुपये दराने अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजे एकूण 141 कोटी सात लाख 82 हजार 799 रुपये हे अनुदान देणे बाकी आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील जुलै ते सप्टेंबर 2024 मध्ये 1७9 कोटी रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले होते. यापैकी अजूनही 11 कोटी शेतकऱ्यांना अनुदान देणे बाकी आहे. तसेच अधिक प्रस्ताव अजून हि संस्थांमध्ये सबमिट करण्यात आलेले आहेत. ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक फाइल जमा करण्यात आले आहे.
Pik Vima : 733 कोटीचा पीक विमा खात्यावर जमा होणार
Pik Vima Live 2025 : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार