
Farm Roads : बऱ्याच काळापासून असलेली अडचण राज्य सरकारने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. शेत रस्ता वरुन बऱ्याच शेतकऱ्यांचे वारंवार वाद होत असतात, यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जाहिर केला आहे. पारंपरिक असलेला रस्ता आता ३ ते ४ मीटर रुंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. जेणे करुन ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर सारखी यंत्रे सहज शेतात घेऊन जात येईल.
शेत रस्ते तयार झाल्यानंतर फायदे ( Benefits after construction of farm roads )
- शेत रस्ताची रुंदी वाढवल्यानंतर मोठाले अवजारे किंवा यंत्रे घेऊन जाण्यास अडचण निर्माण होणार नाही.
- नवीन आलेल्या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना ३ ते ४ मीटर पर्यंत रस्ता हा मिळणार आहे.
- जागेनुसार शेत रस्ता होईल परंतू शेतकऱ्यांचे वारंवार होणारे वाद हे बरेच मिटतील.
राज्य सरकारचे आदेश
- १९६६ साली नुसार कलम १४३ नुसार करवाई होईल.
- ज्या ठिकाणी शेत रस्ताची गरज आहे अश्या ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी करण्यात येणार आहे.
- पारंपारिक रस्तावर कोणताही प्रकारचा वाद तयार होणार नाही, याची पुर्णात दक्षता घेतली जाणार आहे.
- एकदा शेत रस्ता तयार झाल्यावर त्यानंतर सातबारा वर याची नोंद सुध्दा लावण्यात येणार आहे.
- साताबारा वरती शेत रस्ता किती लांबीचा तसेच सीमा व रुंदी ची नोंद केली जाईल.
शेत रस्ता कधी होईल ?
- ज्या शेतकऱ्यांना शेत रस्ता हवा आहे. अश्या शेतकऱ्यांनी अर्ज करावा तसेच ९० दिवसाच्या आता निर्णय घेतला जाणार आहे.
शेत रस्ता बनवण्यासाठी काय करावे लागेल ?
- सर्वात प्रथम शेत रस्ता हा बनविण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करायचा आहे.
- अर्ज देत असताना त्यामध्ये सर्वे नंबर, गट नंबर, शेजारील शेतकऱ्यांन बदल माहिती द्यावी.
- शेत रस्ता बनविण्याअगोदर प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.
- तसेच शेत रस्ता हा सातबारा वरती नोंदवला जाणार आहे.
तुम्हाला या संदर्भात काय वाटते नक्की कमेंट करा तसेच Group वर सुध्दा जॉईन होऊ शकतात.