Farmer Bonus : शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार ?

Farmer Bonus : शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार ?
Farmer Bonus : शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार ?

 

Farmer Bonus : नमस्कार, महाराष्ट्रातील सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरनुसार बोनस जाहीर केला आहे. परंतु त्या संदर्भात अद्याप कोणतीही अपडेट समोर येत नाही, गेले वीस दिवस झाले परंतू शेतककऱ्यांन बोनस बाबत माहिती दिली गेली नाही. महाराष्ट्र शासनाकडून पुन्हा एकदा बोनस साठी उशीर झालेले हे स्पष्ट दिसत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार शासनाची अजूनही पडताळणी सुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बोनस हा उशिरा देण्यात येणार आहे.

धान उत्पादक शेतकरी या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने शासनाच्या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करावी असे आदेश दिले आहे. मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत 37 हजार 888 आणि एक लाख 56 हजार शेतकऱ्यांची नोंदणी आदिवासी विकास महामंडळातर्फे करण्यात आलेली आहे. या अंतर्गत इतक्या नोंदणी झाल्या असतील त्याची पडताळणी ही चालू असल्यामुळे बोनस साठी उशीर होत आहे. तसेच अपडेट मिळाल्यानुसार या अंतर्गत पंचवीस हजार नावे शासन कमी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या हिवाळ्या अधिवेशनात नागपूर येथे प्रति हेक्टर नुसार शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस देण्यात येणार असल्याची अशी घोषणा करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांना आपली माहिती शासनाच्या पोर्टलवर जाऊन देणे अनिवार्य केले होते. शेतकऱ्यांनी जास्तीत बोनस मिळवण्यसाठी अनेक शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळात आपले नाव नोंदवले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बोनस मिळेल परंतु याकडे राज्य सरकारकडे लक्ष होते. त्यामुळे पडताळणी होणार ज्या शेतकऱ्यांचे डबल नावे दिली असतील असे नावे वगळण्यात येणार आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
तुम्हाला याबाबत काय वाटते नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये कळवा धन्यवाद

22 जिल्ह्यात येत्या आठवड्यात पीक विमा वाटप होणार | Crop Insurance

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment