
Farmer Id : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाची आहे. कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सी एस सी या ठिकाणी शेतकऱ्यांना ओळखपत्र मिळते. परंतु कॉमन सर्विस सेंटर वरती आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने शेतकरी ओळखपत्र सगळीकडे अनिवार्य केले आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी पासून काय लाभ मिळू शकतो हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
फार्मर आयडी म्हणजे काय ?
Farmer Id शेतकऱ्यांची ओळख पटवून देते. ज्याप्रकारे आधार कार्ड अनेक योजनेसाठी लागू पडते. त्याच प्रकारे शेतकरी ओळखपत्र म्हणून फार्मर आयडीची गरज पडते. शेतकऱ्यांना अनुदान बियाणे कृषी सेवा मिळवण्यासाठी फार्मर आयडी ची गरज आहे. ज्या प्रकारे आधार कार्ड वरती अकरा अंकी नंबर असतो. त्याच प्रकारे फार्मर आयडी वरती सुध्दा तुम्हाला 11 अंक दिला जाईल, यामुळे तुमची ओळख डिजिटल मार्फत होते.
फार्मर आयडी चे फायदे
- Farmer Id मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ओळख निर्माण होत आहे. कारण या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनेतून अनुदान, पीक विमा मिळत आहे.
- मुख्यमंत्री किसान सन्मानित योजना तसेच प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेतून अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- नुकसान भरपाई किंवा पिक विमा ची रक्कम अडथळा न येता, तुमच्या खात्यात जमा व्हावी यासाठी फार्मर आयडीची गरज लागणार आहे.
- फार्मर आयडीमुळे कमी व्याजात तुम्हाला कर्ज मिळणार आहे. तसेच मार्केटिंग असो किंवा तंत्रज्ञान ही सुविधा सुद्धा तुम्हाला पुरवली जाणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता कोणाला मिळणार ?
केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल, अशा शेतकऱ्यांना 20 हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करावी.
जमीन खरेदी विक्री किंवा ऑनलाईन बाजारात उत्पादने तसेच डिजिटल शेती कृषी धोरण यामध्ये सुद्धा फार्मर आयडी चा उपयोग होणार आहे.
वरील माहिती आवडल्यास व्हाट्सअप ग्रुप वर सामील व्हा धन्यवाद
Pm Kisan News : शेतकऱ्यांच्या 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात