Farmer Id : 20 हप्ता फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार

Farmer Id : 20 हप्ता फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार
Farmer Id : 20 हप्ता फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार

 

Farmer Id : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत नवीन उपाय सुचवत आहे. प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना २० हप्ता जून महिन्यात मिळणार असून तरीही शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ते हे बंद झालेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन एका संकटासमोर जावे लागत आहे. यावरती काय उपाय आहे, हेच आपण पाहणार आहोत अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर शामिल व्हा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आणखीन एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सध्याच्या परिस्थितीत फार्मर आयडी असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ते वितरित केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्यांचे हप्ते हे नक्कीच बंद होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत बोगस शेतकरी मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत. तसेच अपात्र शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये लाभ दिला जात होता. बोगस शेतकऱ्यांना उघड करण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आयडी च्या साह्याने बाद करणार आहेत.

फार्मर आयडी फक्त अशा शेतकऱ्यांकडे असणार आहे. जे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र आहेत. फार्मर आयडी ज्या खात्याशी लिंक किंवा सल्गंन असेल अशाच खात्यावरती प्रधानमंत्री सन्मान निधीचे पैसे खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढल्यानंतर पीएम किसान पोर्टलवर आपल्या आयडीवर अपडेट देणे गरजेचे आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत येणाऱ्या हप्ते थकीत होणार नाही.

Farmer Id म्हणजे काय ?

ज्या प्रकारे आधार कार्ड वरती एक युनिक आयडी नंबर असतो त्याच प्रकारे फार्मर आयडी वरती एक नंबर दिला जाणार आहे. त्या नंबर वरती त्या व्यक्तीचा डेटा राहणार, डिजिटल स्वरूपात जो युनिक आयडी नंबर दिला असेल त्यामध्ये आधार क्रमांक, शेतीचे क्षेत्रफळ, बँक खाते व पिकांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फार्मर आयडी काढावे, त्यामुळे आर्थिक अडचण तुम्हाला निर्माण होणार नाही. तुम्हाला याबाबतीत काय वाटते नक्की कमेंट मध्ये कळवा.

 

Pm Kisan News : पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 9000 रुपये दिले जाणार
Pm Kisan News : पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 9000 रुपये दिले जाणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment