
Gharkul Anudan : राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुन्हा एकदा घरकुल साठी पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान वाढवले आहे. म्हणजे घरकुल साठी आता दोन लाख एक हजार रुपये असे अनुदान मिळणार आहे. याबाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधान परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार लाभार्थ्यांना 50 हजार पर्यंत इतके अनुदान देण्याचा निर्णय घेत आहे. लाभार्थ्यांना आता दोन लाखापर्यंत ही रक्कम मिळणार आहे. 2025 ते 2026 मध्ये पाचव्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय मांडताना हा निर्णय झालेला आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून एका वर्षात 20 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच सामान्य लोकांचे स्वप्न हे आम्ही पूर्ण करू असे आश्वासन राज्य सरकार दिले आहे. अमित शहा यांनी सुद्धा घोषणा केली आहे की, दहा लाखापर्यंत लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा देण्यात येईल. सरकारने तीन महिन्यातील तब्बल ४५ दिवसात सर्व अर्ज हे मंजूर करण्यात आले, तसेच केंद्र सरकारकडून दहा लाख कुटुंबांना पहिला हप्ता देण्यात आलेला आहे. उर्वरित रक्कम पंधरा दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची सुरुवात केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नऊ राज्य मधील 35 शहरांमधील जेवढे गरीब कुटुंब आहेत, अशा कुटुंबांना घरकुल मंजूर करून देण्यात येईल तसेच गरिबांचे स्वप्न पूर्ण करण्यास केंद्र व राज्य सरकार मदत करणार आहे.
