
IMD : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. दिवसा उन्हाचा चटका वाढतो तर रात्री ढगाळ वातावरण तयार होते. अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात शेती पिकावर परिणाम झालेला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा हलवणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक विविध भागात अवकाळी पाऊस पडू शकतो, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. आणि जिल्ह्यामध्ये विजयाच्या कडकडासह जोरदार वारे राहू शकतात त्यामुळे पिकांची नासाडी सुद्धा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारपीट देखील झालेली आहे. अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे सामान्य लोकांना सामना करावा लागला, यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवस सावध राहणे गरजेचे आहे. ही माहिती आवडल्यास नक्की आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा धन्यवाद