
IMD विभागानुसार, जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज, ११ जुलै ते २४ जुलै पर्यंत महाराष्ट्रात पाऊस कसा राहिल ?
आठवड्यातील हवामान अंदाज
१ जुलै २०२५ पासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. हवामान खात्यानुसार विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पडू शकतो. ४ जुलै पासून राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.
IMD नुसार जुलै महिन्यातील पहिले दहा दिवस समाधान कारक पाऊस पडत राहिल. तसेच पीकांना पुन्हा जीवनदान मिळणार आहे. ११ जुलै ते २४ जुलै पर्यंत राज्यात बहूतांश भागात पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची दाट शक्यता आहे.
२५ जुलै नंतर राज्यातील हवामान अंदाज
हवामान खात्यानुसार राज्यात २५ जुलै मॉन्सून सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. ऑगस्ट पर्यंत पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पडू शकतो.