
Kharif 2024 Crop Insurance Update : धाराशिव मधील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना १२ कोटीचा पीक विमा मिळाला नाही. आता पर्यंत ५ लाख शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून २१८ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरित ७५ हजार शेतकऱ्यांना अजूनहि पीक विमा हा मिळाला नाही. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात Kharif 2024 Crop Insurance Update
खरीप हंगाम २०२४ मध्ये अचानक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पीकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी ७ लाख १९ हजान १६७ अर्ज हे पीक विमा कंपन्याकडे केले आहेत. यामध्ये पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तब्बल ५ लाख १९ हजार ७५७ शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याकडून तब्बल २१८ कोटी ८ लाख रुपयाचाा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे.
१२ कोटीचा पीक विमा बाकी
पोस्ट हार्वेस्टिंग कव्हर = ४५ हजार शेतकरी
पूर्वसूचना काढणी कव्हर = ३० हजार शेतकरी
असे एकत्र करुन तब्बल ७५ हजार शेतकऱ्यांचे अजूनहि १२ कोटीची रक्कम विमा कंपन्याकडे आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी तातडीने धाव घेत, जिल्हाधिकऱ्यांकडे शेतकऱ्यांची उर्वरित रक्कत तातडीने बैठक घेऊन वितरीत करण्यात यावी अशी मागणी केला आहे.
केंद्र शासनाचा नवीन नियम
३० एप्रिल २०२४ हा शेतकऱ्यांनसाठी खुप तोट्याचा दिवस ठरला आहे. केंद्र सरकारने नवीन परिपत्र जाहिर केले, उदा.शेतकऱ्यांना १०० पैकी २५ टक्केच नुकसान भरपाई हि वाटप केली जाणार आहे. अशी अट असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये तीव्र नाराजगी आहे. यावरती आपले मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा
तालुक्याला किती पीक विमा मिळाला ?
भूम = १७.०१ लाख रुपये
धाराशिव = ५०.५५ लाख रुपये
कळंब = ३६.२८ लाख रुपये
लोहारा = १७.०० लाख रुपये
परंडा = ८.५६ लाख रुपये
तुळजापूर = ४५.५९ लाख रुपये
उमरगा = २५.९६ लाख रुपये
वाशी = १७.७२ लाख रुपये
एकूण = २१८.०८ कोटी रुपये
खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक पैश्याची गरज
पीक विमा कंपन्याकडे पैसे उपलब्ध असूनहि नुकसान भरपाई देण्यास टाळटाळ करत आहे. पीक विमा कंपन्याचे मते, राज्य सरकारकडून ५९६ कोटी मधील २१३ कोटी रुपये हे आमच्याकडे येणे बाकी आहे. परंतू पीक विमा कंपन्याकडे दुसरा हप्ता राज्य शासनाने वितरीत केला असूनहि नुकसान भरपाई देण्याचे टाळत आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या मते, विमा कंपन्याकडे रक्कम उपलब्ध असूनहि शेतकऱ्यांना पीक विमा वितरीत करण्यासाठी टाळाटाळ करत आहे.