
Kharif Pik Vima 2024 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४ मध्ये सर्वाधिक अडचणी आल्या होत्या. अचानक वातावरणात बदल तसेच अवकाळी पावसामुळे शेती पीकांचे मोठे नुकसान पाहयला मिळाले. शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून राज्य सरकारने तातडीने ३ हजार ८४७ कोटी चा पीक विमा हा मंजूर केला. यामध्ये बहूतांश शेतकऱ्यांच्या खात्यातवर नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही.
पीक विमा कश्याप्रकारे वाटप केला जातो ?
नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून चार ट्रिगरर्सच्या अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि कापणी प्रयोग अशा प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जातो. आता पर्यंत पीक विमा कंपन्यानी दोन ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई वाटप केली आहे. उर्वरिक रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ?
मिळालेला महितीनुसार राज्यात ८० लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्य पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता. यामध्ये ७३ लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्या पीक विमा हा मिळाला आहे. परंतू अद्याप शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याची बाकी आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ३ हजार ८४७ कोटी मंजूर होते त्यापैकी ३ हजार ४३८ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. पहिल्या दोन ट्रिगर अंतर्गत १६१ कोटी रुपये वाटप करणे बाकी आहे. तसेच दोन हप्ते वाटप पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून १०५० कोटी रुपये रक्कम आणखीन वितरीत करण्यात येणार आहे. त्यांनतर शेतकऱ्यांच्या खात्यात २४८ कोटी रुपयेचा पीक विमा खात्यावर जमा होईल.
Weather News : राज्यातील या जिल्ह्यात तूफान पाऊस होण्याची दाट शक्यता ?